ज्ञानरचनावाद तत्वे
ज्ञानरचनावादी शिक्षणाची तत्त्वे
🎋)शिक्षणे ही एक क्रियाशिल प्रक्रिया आहे.
🎋)शिकणे ही अनुभवाधारित प्रक्रिया आहे.
🎋)शिकणे ही एक मानस प्रक्रिया आहे.
🎋)लोक शिकता-शिकताच शिकायला शिकतात.
🎋)शिकणे हे संदभाॅधीन असते.
🎋)शिकणे ही जेवढी व्यक्तिगत तेवढीच सामाजिक कृती.
🎋)शिक्षणात भाषेचे स्थान मध्यवतीॅ असते.
🎋)ज्ञानाने ज्ञान वाढत जाते.
🎋)नवनवी आव्हाने शिकण्याला उद्युक्त करतात.
🎋)शिकण्यासाठी पुरेसा किलावधी आवश्यक असतो.
🎋)शिकण्यासाठी इतरांचे साहाय्य होऊ शकते.
🎋)शिकण्यासाठी भावनिक स्थिरतेची गरज असते.
👥👤👥ज्ञानरचनावादी शिक्षकाची वैशिष्ट्ये 👥👥👤
1)व्यक्तिभेदाचा आदर
2)बहुविध बुध्दिमत्तेचा आदर
3)सकारात्मक प्रबलन
4)मानसिक आधार
5)परीक्षा पद्धती
ज्ञानरचनावाद प्रक्रीया
➖➖➖➖➖➖➖
१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.
२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.
३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.
४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्या माणसाला असावे लागते.
ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.
No comments:
Post a Comment