दिनांक 4 अॉगस्ट 2016 रोजी एस पी कॉलेज पुणे येथे "सरल माहिती व MDM" संदर्भात कार्यशाळा पार पडली. सदर कार्यशाळा अत्यंत महत्वाची होती. त्या कार्यशाळेसाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे 'ई' गव्हर्नर प्रमुख मा. सुनिल मगर साहेब तसेच MDM चे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री वाघमोडे सर व सरल चे राज्याचे तज्ज्ञ श्री प्रदिप भोसले सर हवेली पुणे यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेत MDM संदर्भात जे मार्गदर्शन झाले त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे.
@ MDM संदर्भात महत्वपूर्ण सूचना @
1) MDM दिनांक 20 जुलै 2016 पासून केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी कनेक्ट झाले आहे.
2) ही महत्वपूर्ण योजना असल्याने व या योजनेत केंद्र सरकारकडून अनुदानाचा मोठा हिस्सा असल्याने त्यांचे या योजनेवर बारकाईने लक्ष आहे.
3) जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून या योजनेची अॉनलाईन माहिती भरणे सुरू आहे.
4) ही अॉनलाईन माहिती शालेय पोषण आहार शिजवून देणाऱ्या सर्व खाजगी व सरकारी शाळांना भरणे अनिवार्य आहे.
5) अॉनलाईन माहिती भरण्यासाठी 3 प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष वेबसाईटवरुन, MDM App वरून आणि मोबाईल मेसेज करून अॉनलाईन माहिती भरता येईल.
6) सुरूवातीला प्रत्येक शाळेने आपला 1 जून 2016 ला शिल्लक असणारा शालेय पोषण आहार मालाची आपल्या शाळेच्या MDM लॉगिन वरून opening balance मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. लक्षात घ्या की ही माहिती भरली तरच पुढील सर्व गोष्टी भरता येईल. अन्यथा अजिबात नाही. कारण तुमचा opening balance भरल्यानंतरच MDM App चे कार्य सुरळीतपणे सुरू होईल.
7) Opening balance आणि मागील आतापर्यंत ची daily माहिती (back date data) भरण्यासाठी शेवटची संधी फक्त 16 अॉगस्ट 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परत मुदतवाढ मिळणार नाही. म्हणून सर्वांनी आजअखेर आपण सर्व माहिती भरली आहे का याची खात्री करून घ्यावी.
8) MDM App बाबत थोडेसे वेगळे अनुभव आपल्याला आले असतील. अॅप वरून माहिती भरली होती पण वेबसाईटवर जाऊन पाहिले असता नोंदणी झाली नाही असे आढळून आले असेल. त्याबाबत अशी माहिती आहे की सुरूवातीला देण्यात आलेले अॅप्स हे Test version होते. आणि ते बर्याच मित्रांनी एकमेकांना वेगवेगळ्या माध्यमातून शेअर केले होते. त्या अॅप्स मध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या. पण आता वेबसाईटवर उपलब्ध असलेले MDM App मधून आता माहिती Successfully जात आहे.
9) म्हणून कोणत्याही परिस्थितीत MDM App हे शक्यतो वेबसाईटवर जाऊनच Download करून घ्यावे. त्यासाठी तेथे MDM App download ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
10) MDM माहिती भरण्यासाठी आपल्या शाळेचा School portal चा जो पासवर्ड आहे तोच वापरायचा आहे.
11) दिनांक 16 अॉगस्ट 2016 नंतर कोणत्याही परिस्थितीत दररोज ची माहिती दररोज भरणे अनिवार्य राहील. त्यासाठी कोणतीही सबब चालणार नाही. तेव्हा मुख्याध्यापक किंवा MDM माहिती भरणारी व्यक्ती शाळेत नसेल तर शाळेतील इतर व्यक्तीने ही माहिती भरायची आहे. यासाठी शाळेतील किमान 5 व्यक्तींचे मोबाईल नंबर रजिस्टर्ड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे मोबाईल नंबर मात्र तालुका स्तरावरून रजिस्टर्ड करून घ्यावे लागतील. या 5 व्यक्तीमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सुपरवायझर, शापोआ खाते पाहणारी व्यक्ती आणि उपशिक्षक यांचा समावेश आहे.
12) MDM App मध्ये आतापर्यंत आलेला माल नोंदणी म्हणजे Stock inword ची सुविधा येत्या 8 दिवसात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच ही माहिती मोबाईल वरूनच भरता येईल. मात्र ही सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती कळल्यावर आपण मोबाईल मधील जुने अॅप Uninstall करून मगच नवीन अॅप डाउनलोड करायला विसरू नका.
13) कोणत्याही परिस्थितीत ही योजना दररोज सुरू ठेवायची आहे. यासाठी माल संपला किंवा खराब झाला ही सबब चालणार नाही. याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे. त्यासाठी माल संपण्यापूर्वी 20 दिवस अगोदर पंचायत समिती कार्यालयात कळवून मालाची मागणी नोंदवायची आहे.
14) जर आपल्या शाळेत माल शिल्लक नसेल तर आपल्याला हा माल इतरांकडून घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये आपल्याच शाळेतील 1ते5 किंवा 6ते8 कडून किंवा इतर शाळेच्या 1ते5 किंवा 6ते8 कडून घेता येईल. तसेच लोकसहभाग व Open market म्हणजे खुल्या बाजारातून घेता येईल.
15) Open Market मधून जर माल घ्यायचा असेल तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाची रितसर परवानगी घेतल्यानंतर मालाची खरेदी करता येईल. अन्यथा नाही हे लक्षात घ्यावे.
16) रविवार किंवा इतर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी शापोआ ची कोणत्याही प्रकारची माहिती भरायची गरज नाही. मात्र स्थानिक सुट्टी असेल तर त्या दिवशी शिजवला नाही असे रकान्यात खुण करून न शिजवल्याच्या कारणामध्ये Local Holiday असे नमूद करून माहिती Send करावी.
17) शाळेत नवीन वर्ग सुरू झाला असेल तर अशा वर्गाची MDM साठी नोंदणी BEO Login वरूनच करून घ्यावी लागेल आणि मगच शाळा पातळीवर त्या वर्गाची शापोआ माहिती भरता येईल.
18) MDM साठी पासवर्ड बदलासाठी BEO Login ला सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
19) MDM ची शाळेने दररोज भरलेली माहिती केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण संचालक, केंद्र सरकारच्या शिक्षण विभाग इत्यादींना पाहता येईल. म्हणजेच प्रत्येक टप्प्यावर डेली आढावा घेतला जाणार आहे.
20) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेची नोंदणी सरलला केलेली आहे त्याच शाळेला MDM अॉनलाईन माहिती भरण्यासाठी सुविधा असेल.
(आपल्या मित्रांच्या माहिती करिता इतर अनेक ग्रुपवर हा मेसेज शेअर केला तरी हरकत नाही)

No comments:
Post a Comment