.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

संगणकाची दुनिया

माऊस आणि किबोर्ड (Mouse & Keyboard)
माऊस
     माऊसचा वापर पॉइंट आणि सिलेक्ट करण्यासाठी केला जातो.
माऊस हे हातात मावण्याइतके छोटे आणि वापरण्यास सोपे असे 'इनपूट डीव्हाईस' आहे.  (इनपुट डीव्हाईसेस म्हणजे - ज्या साधनांच्या मदतीने संगणकाला माहिती पुरवली जाते.)  माऊस हा गुळगुळीत पॅडवर ठेवलेला असतो त्यालाच 'माऊस पॅड' असे म्हणतात.  आणि त्यामुळे हाताच्या पंजाने पॅडवर माऊस अत्यंत अलगद सरकवता येतो.  माऊस पॅडवर फिरवला कि त्याच्या हालचालींनुसार कॉम्पुटरच्या पडद्यावरअसा पॉइंटरही येतो.  माऊस केबलने सी.पी.यू. ला जोडलेला असतो.  त्यामुळे तो योग्य ठिकाणी नेउन क्लिक केल्यास सी. पी. यू. ला आज्ञा समजते.
माऊसला दोन किंवा तीन बटणे असतात.  माऊसचे बटन एकदाच दाबून लगेच सोडल्यावर 'क्लिक' असा आवाज येतो.  याच क्रियेला 'माऊस क्लिक' करणे असे म्हणतात.
महत्वाचे - ज्यावेळेस आपण माऊस बटन एकदाच दाबतो त्याला 'सिंगल क्लिक' असे म्हणतात.  आणि लागोपाठ दोनदा तीच क्रिया केल्यास म्हणजे लागोपाठ दोन वेळा माऊस क्लिक केल्यास त्यास 'डबल क्लिक' असे म्हणतात.
माऊसचे डावे (लेफ्ट) बटन दाबल्यास त्याला 'लेफ्ट क्लिक' असे म्हणतात आणि उजवे (राईट) बटन दाबल्यास त्यास 'राईट क्लिक' असे म्हणतात.
     खालील आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन माऊस कश्या प्रकारे दिसतो.  आपलाही माऊस तसाच आहे कि नाही दिसायला?  तर मग ओळखा आणि करा सराव लेफ्ट आणि राईट बटन वापरण्याचा.
आधुनिक वेगवेगळ्या डीझाईन्स मधले आकर्षक मॉडेलही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
     अगं वेण्णा थांब जरा.  काय झाले मामा?  माऊस वापरताना आपल्या हाताचे मनगट नेहमी सरळ ठेवले पाहिजे ते केव्हाही वरच्या किंवा खालच्या दिशेला वाकवू नये.  नेहमी माऊस योग्य रीतीने आपण हातात धरला आहे कि नाही ह्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर आपला हाथ दुखायला लागू शकतो.
खालील आकृती पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन कि माऊस आपण कश्या रीतीने पकडला पाहिजे.
एखादे फोल्डर किंवा फाईल मला ओपन करायचे असल्यास मी माऊसचे लेफ्ट बटन वापरणार.
उदाहरणार्थ - मला माझी ‘अनुप्रिया’ नावाची फाईल ओपन करायची आहे तर मी माऊसचे लेफ्ट बटन दोनदा पटापट दाबणार.  त्यामुळे माझी ती फाईल ओपन होईल.  जर मी फक्त एकदाच दाबले किंवा हळू हळू दोन वेळा क्लिक केले तर ती फाईल फक्त 'हाईलाईट' झालेली दिसेल.  पण ओपन होणार नाही.  म्हणजे तुम्ही ती फाईल सिलेक्ट केलेली आहे.  परंतु संगणकाला त्या व्यतिरिक्त दुसरी आज्ञा मिळालेली नाही असा त्याचा अर्थ होतो.
जर मी दोनदा पटापट बटन दाबले तर संगणकाला आज्ञा मिळेल कि मला ती फाईल उघडून पहायची आहे.  ती फाईल संगणक ओपन करून त्यातली माहिती मला चटकन दाखवेल.
किबोर्ड -
आता आपण किबोर्ड विषयी जाणून घेऊयात.
     किबोर्ड अंक आणि अक्षरे असलेल्या कीज नी बनलेला असतो.  किबोर्डचा वापर टाईपिंगसाठी करतात.  त्याद्वारे संगणकाला टाईप केलेली माहिती आज्ञेच्या स्वरुपात संगणकाला पुरवली जाते आणि त्याद्वारे आपण टाईप केलेले संगणक आपल्याला मॉनिटरच्या सहायाने संगणकाच्या पडद्यावर दाखवतो.  त्यामुळे किबोर्डला इनपुट डीव्हाईसेस असे म्हणतात.
किबोर्ड आणि किबोर्ड वरील विविध कीज
काम करणाऱ्याच्या सोयीसाठी कीबोर्डवरील किजचे खालीलप्रमाणे गट केलेले असतात.
प्रथम पाहूयात,
न्यूमेरिक(अंकाच्या) कीज - या गटामध्ये ० ते ९ पर्यंतचे अंक आणि गणिती क्रियाची चिन्हे असणार्या किज चा समावेश केलेला असतो.
अल्फाबेटीकल (अक्षरांच्या) कीज - या गटामध्ये इंग्रजीतील A ते Z अक्षरे असणाऱ्या कीज चा समावेश असतो.
फंक्शन (ठराविक कामे करणाऱ्या) कीज - या गटामध्ये विशिष्ट प्रकारची कामे करणाऱ्या कीज चा समावेश असतो.
ऐरो कीज किंवा कर्सर कीज - या गटामध्ये कर्सरची वर, खाली, डावीकडे, उजवीकडे, अशा वेगवेगळ्या दिशा दर्शवणाऱ्या बाणाची चिन्हे असतात.  ह्या किजच्या मदतीने कर्सरची हालचाल होते.
स्पेस बार की - ही कीबोर्डवरील सर्वात लांब की असते.  तिच्यावर नाव नसते.  दोन शब्दांमध्ये अंतर सोडण्यासाठी या कीचा वापर होतो.
एनटर की - या किजच्या मदतीने संगणकाला आज्ञा पूर्ण झाल्याचा संदेश देत येतो.  त्याचप्रमाणे कर्सर वरच्या ओळीवरून खालच्या ओळीवर नेता येतो.
एस्केप की - या किजच्या मदतीने सुरु असलेल्या प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी केला जातो.
विशिष्ट की (स्पेशल कीज ) - संगणकाकडून काही नेहमीची कामे करून घेण्यासाठी काही स्पेशल कीज असतात त्या आपण आता पाहूयात.
शिफ्ट की - कीबोर्ड वरील किजच्या वरच्या भागात दिलेली केपिटल अक्षरे व चिन्हे टाईप करण्यासाठी शिफ्ट की दाबावी लागते.
बॅक स्पेस की - कर्सरच्या डावीकडील चुकून टाईप केलेले अक्षर किंवा चिन्ह पुसण्यासाठी ह्याचा वापर होतो.
डिलिट की - कार्सारच्या उजवीकडील अक्षर पुसण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
कॅप्स लॉक की - सतत कॅपिटल अक्षरात टाईप करायचे असल्यास याचा वापर होतो.
     आज आपण माऊस आणि कीबोर्ड म्हणजे काय हे शिकलो आहोत.  तसेच त्यांचे बटन्स ह्यांविषयी माहिती मिळविली.  आणि त्यांचा उपयोग प्रत्यक्षात करायलाही शिकलो. तसही आता प्रात्याक्षिके (प्रक्टिकल) करताना पुन्हा ही बटन्स आपल्याला वापरावी लागणार आहेतच तेव्हा पुन्हा उजळणी होणारंच.  नाही का!!!!!
ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) / परिचालन प्रणाली
     आज आपण जाणून घेऊयात ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS म्हणजे काय?  आपण जेव्हा कॉमप्यूटर(संगणक) सुरु करतो, तेव्हा माऊस पोइंटर हलवतो, गेम खेळत...
बूटिंग क्रिया (Booting Process)
           संगणक सुरु करण्याच्या किंवा होण्याच्या प्रक्रियेला 'बूटिंग प्रोसेस' असे म्हणतात. जेव्हा आपला संगणक सुरु होतो तेव्...
संगणकाच्या विश्वात...माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
Information Communication and Technology (ICT)  माहिती संप्रेषण तंत्रज्ञान हे शाळा, कॉलेज, तसेच IT Person ह्यांसाठीच मर्यादित नसून ...gk

No comments:

Post a Comment