ऑनलाईन बँकिंग
ऑनलाईन बँकिंग
बँकेचे अथवा पैशांचे व्यवहार इंटरनेटद्वारे करणे म्हणजेच ऑनलाईन
बँकिंग. आपण असे इंटरनेटद्वारे ऑनलाईन बँकिंग आपल्या
घरामधून, ऑफिसमधून अथवा जगातून कुठूनही करु शकता. काही
वर्षांपूर्वी फक्त मोठ्या आंतरराष्ट्रीय (International)
बँकेद्वारे दिली जाणारी ही ऑनलाईन बँकिंग सेवा आता
जवळजवळ सर्वच लहानमोठ्या बँकेद्वारे दिली जाते.
सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन होणारी जवळजवळ
सर्वच कामे सध्या ऑनलाईन बँकिंगद्वारे शक्य झाली आहेत. जसे
आपले खात्याची माहिती घेणे, शिल्लक रक्कमेची चौकशी,
बिल भरणा, पैसे दुसऱ्यांना पाठविणे, पेमेंट थांबविणे, तसेच
ऑनलाईन कर्ज (लोन) अथवा क्रेडीट कार्डाची मागणी करणे
इ. त्यामूळे हे ऑनलाईन बँकिंग फार सोईचे होऊ लागले आहे.
टेलिफोनचे बिल, विजेचे बिल, गॅसचे बिल या छोट्या गोष्टी
देखिल आता ऑनलाईन बँकिंगद्वारे सहज शक्य आहे. आपण घर
बसल्या वेळीच सर्व बिले भरु शकता. तसेच यामध्ये असलेल्या
ऑटो बिल पेमेंटद्वारे तर आपल्याला लक्षात ठेवून बिल
भरण्याची देखिल गरज नाही, कारण महिन्याच्या बिलाची
तारीख आली की वेळीच आपले बिल आपल्या बँक खात्यामधून
भरले जाते आणि यासाठी आपल्याला कुठलेही अधिक पैसे
द्यावे लागत नाहीत.

No comments:
Post a Comment